गडचिरोलीतील बेकायदा लोह खदानीविराधात शेकाप आक्रमक

रामदास जराते यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत ठिय्या आंदोलन
। गडचिरोली । प्रतिनिधी ।
गडचिरोली जिल्ह्यात बेकायदा लोह खदानी आहेत. त्या कायमस्वरुपी रद्द करण्यासाठी शेकापने आक्रमक भूमिका घेतली असून शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.26) बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील बेकायदा 25 लोह खदानी कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीकरीता सुरजा गड पारंपारिक गोटू ल समिती आणि जिल्हा महा ग्रामसभा स्वायत परिषद यांच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आलेला आहे. तत्पूर्वी सोमवारी भव्य जहाल मोर्चा काढून शासन प्रशासनाला या बाबतचे निवेदन देण्यात आले.गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी जनतेने पुकारलेल्या या आंदोलनाला देशभरात पोहचविण्यासाठी विविध व्यक्ती, संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी देशभरातून सहकार्य करुन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन रामदास जराते यांनी केले आहे.

Exit mobile version