शेकापने श्री वरदविनायकाचे आशिर्वाद घेऊन फोडला प्रचाराचा नारळ

। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापुर नगरपंचायतीच्या निवडणुक प्रचाराचा शुभारंभ महड येथील श्री वरदविनायकाचा आशिर्वाद घेऊन शेकापने 14 डिसेंबर रोजी शुभांरभ केला आहे. खालापुर नगरपंचायत मधील सत्तेचा दावेदार म्हणुन शेकापकडे पाहीले जाते. संपलेल्या नगरपंचायतमध्ये शेकापने 17 पैकी 10 जागा निवडुन आणुन राष्ट्रवादीच्या दोन जागा सोबत घेऊन सत्ता मिळवली होती. मात्र 2021 च्या निवडणूकीत राष्ट्रवादीची आघाडी सेनेसोबत असल्याने शेकापने 16 जागांवर उमेदवार उभे करुन विरोधकांना पुन्हा तगडे आवाहन दिले आहे.
माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन संघ़टनात्मक पातळीवर सर्वांना निवडुन आणण्याची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. शेकापच्या या रणनितीमुळे विरोधक धस्तावले आहेत. खा.ता.शि.प्र. मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम हे नामाप्र मधुन उमेदवार असुन या जागेची निवडणुक स्थगित आहे. म्हणून जंगम पती पत्नी हे स्वतः सर्व सदस्यांना निवडून आणण्याचे पुर्ण ताकदीने प्रयत्न करणार ही शेकापच्या जमेची बाजु आहे.
यावेळी शेकाप नेत्या माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम यांनी श्री वरद विनायकांने आम्हाला कौल दिलेला आहे. मला खात्री आहे की गेल्या वेळेस आम्ही 10 जगावर निवडून आलो होतो, यावेळी 16 च्या 16 जागांवर नक्की विजयी होऊ. उमेदवार कोण हे असण्यापेक्षा आपल्याला खालापुरचा विकास करायचा आहे. खालापुरच नाव कान्या कोपर्‍यात पोहचल पाहिजे हे ध्येय डोक्यात आहे त्यामुळे या उमेदवार म्हणून कोणीही असल तरी काम करणारे संतोष जंगम आणि शिवानी जंगम हे कायम आहे राहणार आहे. जी काम अर्धवट राहिलेली आहेत ती काम आम्हाला पूर्ण करायची आहेत. यावेळी सुद्धा आम्हाला संधी द्या जी विकास कामे प्रलंबित आहेत ती विकास कामे पूर्ण करायची आहेत. यामध्ये मैदान, हॉस्पिटल ही पूर्ण करण्याची गरज आहे म्हणुनच पुन्हा एकदा आम्हाला संधी द्या, असे यावेळी शिवानी जंगम यांनी जनतेला आवाहन केले.

Exit mobile version