ताजपूरमध्ये शेकाप चषक क्रिकेट स्पर्धा

मोहन धुमाळ यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन
चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते होणार बक्षीस वितरण

| अलिबाग | प्रतिनिधी |

तालुक्यातील ताजपूर येथील श्री गणेश कला क्रीडा व शैक्षणिक मंडळाच्या वतीने शेकाप चषक- 2024 या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. 5 जानेवारी रोजी या स्पर्धेला सुरुवात झाली. रामराजचे माजी सरपंच मोहन धुमाळ यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शंकर पाटील, लक्ष्मण झावरे, महेश झावरे, मेघश्याम झावरे, गिरीश झावरे, नितेश पाटील, अनिल झावरे, ओमकार भोपी, नरशे झावरे, प्रतिक झावरे, कल्पेश झावरे, उमाकांत पाटील, हितेश पाटील, ऋतिक झावरे, श्रेयश झावरे आदी मान्यवरांसह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू उपस्थित होते.

ताजपूर येथील मैदानात होणाऱ्या तीन दिवसीय स्पर्धेत एकूण 30 संघ सहभागी झाले आहेत. प्रथम क्रमांकाला रोख 33 हजार 333 रुपये व चषक, द्वितीय क्रमांक 22 हजार 222 रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी 11 हजार 111 रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांना आकर्षक बक्षीस देऊन सन्मानित केले जाणार आहे. बक्षीस वितरण दि. 7 जानेवारी रोजी सायंकाळी शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Exit mobile version