पोलादपूर । प्रतिनिधी ।
भारतीय शेतकरी कामगार पक्ष शाखा पैठण (औरंगाबाद) यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील गावांना धान्य व कडधान्य वाटप करण्यात आले. पैठण तालुका शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस भाई चंद्रशेखर सरोदे आणि टिम यांच्या माध्यमातून पुरग्रस्त असलेली गांव धारवली, पाटीलवाडी,किरवली, पवारवाडी, विठ्ठलवाडी, कालवली या गावापड्यांना अन्नधान्य आणि कडधान्य साडेतीन टन वाटप करण्यात आले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती कमेटी सदस्य भाई आकाश निर्मळ, भाई नरेंद्र दहिठणकर, भाई भाऊसाहेब कचरे, सरगर, तांगडे साहेब यांच्यासह पोलादपूर तालुका चिटणीस भाई योगशजी महाडिक, समीरभाई चिपळूणकर,यासीनभाई व त्यांचे स्थानिक सहकारी उपस्थित होते.