। सुधागड। वार्ताहर ।
१८ डिसेंबर ला पार पडलेल्या रायगडातील ग्रामपंच्यात निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला आज सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. सर्व पक्षाच्या उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी सकाळपासून मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी केली आहे. आज ही मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होऊन या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
चंदरगाव ग्रामपंचायतीतील सरपंचपदासाठी सखाराम पांडू मरकड हे ३२५ मतांनी निवडून आले आहेत व मंगल्या वाली दोरे(अपक्ष ) यांचा २५६ मतांनी प्रराभव झाला आहे.
हातोंड ग्रामपंचायतीवर शिंदे गट, खवली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तिवरे ग्रामपंचायतीवर शिंदे गट, शिलोशी ग्रामपंचायतीवर भाजपा, चिवे ग्रामपंचायतीवर शिंदे गट, खांडपोली ग्रामपंचायतीवर शिंदे गट असे विजयी पक्ष आहेत.
सविस्तर वृत्त काही वेळात…..







