। अलिबाग । प्रतिनिधी ।
आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकाप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक बुधवारी (दि.11) सकाळी साडेदहा वाजता आयोजित केली आहे. अलिबागमधील शेतकरी भवन येथील सभागृहात ही बैठक पार पडणार आहे. विभागातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन शेकाप जिल्हा कार्यालयीन चिटणीस अजय झुंजारराव यांनी केले आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रदीप नाईक, तालुका चिटणीस अनिल पाटील, माजी नगरसेवक अॅड. गौतम पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असल्याची माहिती झुंजारराव यांनी दिली.