। उरण । वार्ताहर ।
चिर्ले गावच्या शैक्षणिक आणि आरोग्यासाठी झपाटलेल्या सुधाकर तथा काका पाटील यांना शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना आघाडीने थेट सरपंचपदाची उमेदवारी दिली आहे. यापूर्वी चिर्ले ग्रामपंचायतीचे सरपंचपद भुषविलेल्या सुधाकर पाटील यांचा दांडगा लोकसंपर्क आणि दातृत्वामुळे विजय सोपा मानला जात आहे. पंचक्रोशीतील गोरगरीबांना औषधोपचार करण्यासाठी परिसरात मोठे रुग्णालय उभारण्याचा मानस सुधाकर पाटील यांनी व्यक्त केला असून त्यासाठी जागा देखील त्यांनी निश्चित केली आहे.
तसेच आपल्या आर्यन एंटरप्रायझेस या कंपनीच्या माध्यमातून गावातील बेरोगजारांना आतापर्यंत रोजगार उपलब्ध करुन दिला असून यापुढे देखील जास्तीत जास्त रोजगार देण्यात येणार असल्याचे सुधाकर पाटील यांनी सांगितले. तसेच गावासाठी मंगल कार्यालय सुरु करण्याचा मनोदय देखील त्यांनी बोलून दाखवला आहे. सुधाकर पाटील यांच्या कार्यामुळेच त्यांना जांभुळपाडा, गावठाण आणि चिर्ले या तीन गावांनी एकत्रित बैठक घेऊन त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.
उद्योगपती असणारे सुधाकर पाटील यांनी आतापर्यंत स्वखर्चातून जिल्हा परिषदेच्या शाळेचे काम केले आहे. दीड कोटी खर्च करुन करण्यात आलेल्या या कामातून शाळेचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. जांभुळपाडा प्राथमिक शाळेचे देखील काम करण्यात येणार असून भुमिपूजन प्रस्तावित आहे.
38 एकर जागेत वृक्षारोपण करुन पर्यावरण संतुलनाचे मोठे काम देखील सुधाकर पाटील यांनी केले आहे. समाजकार्यात सक्रीय सहभाग घेणारे सुधाकर पाटील यांनी गावच्या विकासासाठी पाण्याची पाईप लाईन, विद्युत पुरवठा, एकविरा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष असून त्या माध्यमातून प्रत्येक वर्षी उत्सवात मोठया प्रमाणावर अन्नदानाचे कार्य करत असतात. दरवर्षी त्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना तिर्थस्थंळाना भेटी घडवून आणण्याचा उपक्रम देखील ते राबवित असतात.
भविष्यात करण्यात राबविण्यात येणार्या योजनांची माहिती देताना सुधाकर पाटील यांनी सांगितले की विधवा महिला तसेच दुर्बल घटकांसाठी पेन्शन योजना राबविण्यात येणार आहे. बाकाली आणि मोठा तलाव परिसराचे सुशोभिकरण करुन वॉकींग ट्रक उभारण्यात येणार आहे.
पूर्ण केलेल्या कामांचा तपशील
1) गावाच्या हद्दीमध्ये 38 एकर जमीन विकसित करुन एकविरा सामाजिक संस्थेमार्फत पन्नास हजार वृक्षारोपण करुन लोकांच्या धार्मिक भावना जागृत ठेवून सदर जागेवर विद्युत पुरवठा व पाणीपुरवठा योजना अंमलात आणली आहे व त्या ठिकाणी एकविरा मातेचे देऊळ बांधण्यात आले आहे.
2) जीर्ण झालेल्या 103 वर्षापूर्वीची शाळा मोडून त्या ठिकाणी डिजीटल शाळेचे बांधकाम केलेले आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षणाकरीता उत्तम माध्यम निर्माण झाले आहे व शाळेच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा सुधारला आहे. त्यासाठी जवळजवळ सिडकोनी खर्च स्वखर्चाने केलेला आहे.
3) शाळेच्या आवारात स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून त्याभोवती सी.सी. कॅमेरे बसवून सुशोभित केलेले आहे.
4) स्मशानभूमीचे नुतनीकरण करुन त्याभोवती कपाऊंड केलेले आहे. तसेच लाईटची व्यवस्था व पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच त्या जागेमध्ये 500 माणसांची व्यवस्था केलेली आहे.
5) गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत तसेच त्यासाठी लागणारी आसनव्यवस्था, गणवेश शिक्षण साहित्य पुरवण्यात सदैव मदत केलेली आहे.
6) गावांमध्ये लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करुन गावामध्ये होणारे चोरी, तसेच आपापसात होणारी भांडणे या प्रकरणात आळा बसावा हा हेतू लक्षात घेऊन तिन्ही गावामध्ये चिर्ले, गावठाण, जांभूळपाडा मध्ये सी.सी. कॅमेरे बसविण्यात आले.
7) चिर्ले, गावठाण, जांभूळपाडा रस्त्यालगत स्ट्रीट लाईट व्यवस्था करण्यात आलेली आहे.
सत्तेत आल्यानंतर करण्यात येणारी कामे
1) ग्रामपंचायत, ऑफिसचे अद्ययावत पद्धतीने बांधकाम करणे.
2) गावामध्ये वाढत्या लोकवस्तीचे विचारात घेऊन ओहर पाणी टाकीची व्यवस्था जेणेकरुन लोकांना सुरक्षित पाणी पुरवठा होईल.
3) तलावाचा परिसर विकसित करुन तेथे गार्डन बनविण्यात येईल.
4) गावामध्ये, हॉस्पिटल करण्यात येईल. जेणेकरुन लोकांना कमीत कमी खर्चात आपले उपचार करता येईल त्यामुळे गरीब लोकांना दिलासा मिळेल.
5) जांभूळपाडा मध्ये तेथील गावकरी व कातकरी आदिवासी लोकांना कमीतकमी खर्चात आपली उपचार करता येईल. त्यामुळे गरीब लोकांना दिलासा मिळेल.
6) लोकांना शासनाकडून मिळणार्या सोयीसुविधा असेल बजावणी करण्यात येईल. त्यामुळे प्रत्येक नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल.
उमेदवार
थेट सरपंच सुधाकर भाऊ पाटील
वार्ड क्र. 1 कातकरी मेघनाथ गणपत
पाटील विद्या निवृत्ती
वार्ड क्र. 2 मढवी अनुराज महादेव
घरत प्रगती विशाल
मढवी रंजना तुळशीराम
वार्ड क्र. 3 टकले आकाश शंकर
पाटील राजेश विश्वनाथ
मढवी प्रिती किशोर
वार्ड क्र. 4 घरत शरद हरिदास
पाटील मयुरी अमर
पाटील करिश्मा वनराज