शेकापच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या गोरीबाई राठोड यांचे निधन

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबागमधील शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या गोरीबाई रुपसिंग राठोड यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 70 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पती, मुलगा व पाच मुली असा परिवार आहे.

गोरीबाई राठोड या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. राजकिय, सामाजिक व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी अगदी कमी कालावधीत एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. महिलांना एकत्र करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. एक संघटक म्हणून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. मुंबई येथील रुग्णालयात त्यांच्या आजारपणावर उपचार सुरु होते. मंगळवारी पहाटे त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. अलिबागमधील शास्त्रीनगर येथील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी पार्थिव आणले होते. त्यानंतर कर्नाटक राज्यातील मुळ गावी त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती राठोड कुटूंबियांकडून देण्यात आली.

गोरीबाई याच्या निधनाने शेकापमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनी शोक व्यक्त केला.

Exit mobile version