महिलांच्या सबलीकरणासाठी शेकाप आग्रही; चित्रलेखा पाटील यांचे प्रतिपादन

खंडाळे ग्रामपंचायतील महिला बचत गटांना सतरंजी वाटप

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्ष हा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. स्व. प्रभाकर पाटील, जयंत पाटील, मीनाक्षीताईंनी नेहमीच महिलांच्या सबलीकरणाची शिकवण सर्वांना दिली आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षातच खर्‍या अर्थाने महिलांचे सबलीकरण होत आहे. याचेच उदाहरण म्हणजे, खंडाळा ग्रामपंचायतीत होत असलेल्या महिला बचत गटांच्या सतरंजी वाटपातील कार्यक्रमात व्यासपीठावर मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती असल्याचे प्रतिपादन शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले.
15 व्या वित्त आयोग 2020/21 च्या बंधिस्त निधीतून खंडाळे ग्रामपंचायतील महिला बचत गटांना सतरंजी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून चित्रलेखा पाटील उपस्थित होत्या. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रियदर्शनी पाटील, माजी उपसभापती मीनल माळी, सरपंच रंजना नाईक, उपसरपंच अशोक थळे, माजी उपसरपंच संतोष कनगुटकर, ग्रामपंचायत सदस्या सुचिता कावजी, अनेशा पाटील, समीक्षा पाटील, रजिता पाटील, वैदेही थळे, अरुणा राऊत, सानिया पाटील, अस्मिता नाईक, मंदा नाईक, ग्रामसेवक शेखर बळी, वंदना नाईक, जयश्री पाटील, शेकाप महिला आघाडीच्या तन्वी पाटील, श्रेया केळकर आदी उपस्थित होते. यावेळी तीन ग्रामसंघाशी निगडीत असलेल्या तब्बल 64 बचत गटांतील 676 महिलांना सतरंजीचे वाटप करण्यात आले.
चित्रलेखा पाटील पुढे म्हणाल्या की, महिला कार्यकर्त्या पुढे आल्या पाहिजेत अशीच शिकवण पक्षनेतृत्वांनी नेहमीच दिली आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी पुरुष कार्यकर्त्यांचे पाठबलदेखील महत्त्वाचे आहे. शेकापक्षामुळे सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचविणे शक्य होत आहे. पीएनपी एज्युकेशन सोसायटीमुळे या परिसरातील तरुण उच्चशिक्षित होत असून, त्यात मुलींचा अधिक समावेश असल्याबाबत चित्रलेखाप पाटील यांनी समाधान व्यक्त केले. खंडाळामध्ये मंदिर उभारणार असल्याचेही यावेळी त्यांनी जाहीर करतानाचा नागाव येथील क्रीडा संकुलात महिलांनी भेट देण्याचे निमंत्रणदेखील दिले. तर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रियदर्शनी पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 15 व्या वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग चांगल्या प्रकारे केला जात असल्याबाबत समाधान व्यक्त केले.


महिला कार्यकर्त्या पुढे आल्या पाहिजेत अशीच शिकवण पक्षनेतृत्वांनी नेहमीच दिली आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी पुरुष कार्यकर्त्यांचे पाठबलदेखील महत्त्वाचे आहे. शेकापक्षामुळे सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचविणे शक्य होत आहे.
चित्रलेखा पाटील, शेकाप महिला आघडीप्रमुख

Exit mobile version