| अलिबाग | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यात बुधवारी (दि.27) शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित केला आहे. मुरूड-जंजिरामधील हिंदू एज्युकेशन सोसायटी (हिंदू बोर्डिंग) विश्रामबागेच्या समोर हा मेळावा शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साडेतीन वाजण्याच्या सुमारास होणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, शेकाप नेते तथा माजी आ. पंडित पाटील, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, मुरुडचे शेकाप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा चिटणीस मंडळाकडून करण्यात आले आहे.