कळंब ग्रामपंचायतीवर शेकापचा दणदणीत मतांनी विजय

। नेरळ । बातमीदार ।
कर्जत तालुक्यातील 13 सदस्यीय कळंब ग्रुप ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रमोद कोंडीलकर यांनी आपले ग्रामविकास आघाडी यांच्या माध्यमातून थेट सरपंच पदावर दणदणीत विजय मिळविला.शेतकरी कामगार पक्ष,राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ग्रामविकास आघाडीने ही निवडणूक लढविली होती आणि थेट सरपंच पद 453 मतांनी तर नऊ सदस्य निवडून आणत कळंब ग्रामपंचायत वर वर्चस्व मिळविले.

कळंब ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच प्रमोद कोंडीलकर यांना शेतकरी कामगार पक्षाने थेट सरपंच पदाच्या निवडणूक मध्ये उतरवले होते.तेथे शेतकरी कामगार पक्षाला शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत ग्रामविकास आघाडी स्थापन केली होती.शेकाप कडून तालुका चिटणीस श्रीराम राणे आणि नारायण डामसे यांनी निवडणुकीत नियोजन केले होते.या निवडणुकीत 13 पैकी 9जागांवर ग्रामविकास आघाडी ने विजय मिळविला.तर विरोधी पक्षाला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.

कळंब ग्रुप ग्रामपंचायत
थेट सरपंच
1-प्रमोद तुकाराम कोंडिलकर 1474- विजयी
शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ग्रामविकास आघाडी
2-अरुण बदे -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 1041
3-रामचंद्र बदे -बाळासाहेबांची शिवसेना 660

प्रभाग एक
विजयी उमेदवार
प्रसाद बदे 225
रंजना वाघ 282

पराभूत
सुलतान कुरेशी 223
सरिता वाघ 199
वैशाली वाघ 185

प्रभाग 2
विजयी उमेदवार
ओमप्रकाश बदे 275
निर्मला निरगुडे 277
रेश्मा बदे 286

पराभूत उमेदवार
विजय बदे 222
नीरा निरगुडे 253
योगिता शेळके 258

प्रभाग 3
विजयी उमेदवार
प्रकाश निरगुडे 427
संतोष मोडक 441
ताई पारधी 540

पराभूत उमेदवार
आम्बो पारधी 238
काशिनाथ पुंजारा 259
हिरा पारधी 194

प्रभाग 4
विजयी उमेदवार
आंबो पारधी 263
सुगंधा माळी 352
तानिया लाँगडे 271

पराभूत उमेदवार
नरेश निरगुडे 215
ज्योती मुरकुटे 228
शीफा खान 212

प्रभाग 5
विजयी उमेदवार
शाहीन मस्ते 288
रेवता ढोले 246

पराभूत उमेदवार
राहुल परदेशी 160
सरिता वाघ 238

Exit mobile version