| नेरळ | प्रतिनिधी |
कळंब ग्रुपग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक मध्ये शेतकरी कामगार पक्ष,शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्या ग्रामविकास आघाडीने प्रचार रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन केले. या निवडणुकीत ग्रामविकास आघाडी निर्भेळ यश मिळविणार असा दावा शेकापचे विभाग चिटणीस पांडुरंग बदे यांनी व्यक्त केला आहे.
तेरा सदस्यीय कळंब ग्रुप ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शेकाप ,शिवसेना ठाकरे शिवसेना आणि य काँग्रेस या तीन पक्षांनी ग्रामविकास आघाडी स्थापन केली आहे. थेट सरपंच पदासाठी माजी सरपंच शेकापचे प्रमोद कोंडीलकर यांना संधी देण्यात आली आहे.पाच प्रभागातून 13 सदस्य निवडले जाणार आहेत.त्यानिमित्त गावातून प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये शेकाप नेते श्रीराम राणे, नारायण डामसे, महेश म्हसे, पांडुरंग बदे,अनिल जोशी, राणे, जयवंती हिंदोळा, विठ्ठल बदे,संतोष बदे, विजय बदे,विजय माळी, महादेव पोशीरकर, रईस बूबरे,सीताराम शंकर बदे,जैतू बदे,माजी सरपंच रेवता ढोले, उपसरपंच राहुल परदेशी,युवा सेना शाखा अधिकारी अरुण खाडे,उमेदवार रेवता ढोले,राहुल परदेशी,सुलतान कुरेशी,रंजना वाघ,विजय बदे,निर्मला निरगुडे,रेश्मा बदे,प्रकाश निरगुडे,संतोष मोडक,ताईबाई पारधी,नरेश निरगुडे,सुगंधा माळी, शिफा खान आदी सर्व उमेदवार सहभागी झाले होते.