शेकापची बांधिलकी सर्वसामान्यांशी

चित्रलेखा पाटील यांचे प्रतिपादन
खांबेरे मोफत चष्मेवाटप, पारंगखारला सायकलींचे वाटप

| चणेरा | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाची बांधिलकी सर्वसामान्यांशी असून, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष नेहमीच अग्रभागी राहिला आहे, असे प्रतिपादन शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले. रोहा तालुक्यातील खांबेर येथे नेत्रतपासणी करुन मोफत चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. दरम्यान, पारंगखार येथे गरीब व गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आल्या.

खांबेरे येथे 180 गरजू रुग्णांची नेत्रतपासणी करुन त्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी चित्रलेखा पाटील यांच्यासह शंकरराव म्हसकर खरेदी-विक्री चेअरमन, अमोल शिंगरे, विकास भायतांडेल, संदेश विचारे, गोविंद भायतांडेल, दीपक गिजे, गोपीनाथ गंभे, तुळशीराम पवार, मारुती खांडेकर, परशुराम आंब्रे उपस्थित होते. डॉ. अरविंद माटल आणि डॉ. नंदकिशोर म्हात्रे यांनी नेत्रतपासणी केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कमलाकर साळवी, संजय गोरिवले, विष्णू नावले, दीपक गोरिवले, श्रीधर पडवळ, बबन पडवळ, सरिता बेणारे, योगिता जंगम, ग्रामस्थ आणि कार्यकर्त्या यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश भगत यांनी उत्तम केले.

दरम्यान, पारंगखार येथे 28 गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप हेमंत ठाकूर मजूर फेडरेशन अध्यक्ष, गोपीनाथ गंभे विविध कार्य सोसायटी चेअरमन चणेरा, विठ्ठल मोरे पीएनपी स्कूल तळाघर अध्यक्ष, राज जोशी, अमोल शिंगरे, शंकर दिवकर, विकास भायतांडेल, नामदेव भोपे, चंद्रकांत झोरे, संदेश विचारे, परेश म्हात्रे, गोविंद भायतांडेल, राजश्री शाबासकर, विजय पावसे, विलास म्हात्रे, तानाजी म्हात्रे, अमित देशपांडे, रामनाथ घाग, पांडुरंग तांबडे, रामचंद्र घाणेकर, संतोष घाग, मनोहर गुंड, मंगेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, शेतकरी कामगार पक्षाने कायमच मुलींच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, गोरगरिबांसाठी काम केले आहे. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणात अनेक अडचणी येतात. अनेक किलोमीटर पायपीट करुन शाळा गाठावी लागते. परिणामी, अनेक मुलींचे शिक्षण थांबते. या सर्व गोष्टींचा विचार करुन मुलींचे शिक्षण कुठेही थांबू नये यासाठी सायकल वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. आज हजारो सावित्रीच्या लेकींना आपण सायकलींचे वाटप केले असून, त्यांची शिक्षणासाठी होणारी पायपीट थांबविली असून, त्यांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण करण्याचे काम केल्याचे चित्रलेखा पाटील यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, सायकली मिळाल्यामुळे विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी ताईंचे मनापासून आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग तांबडे यांनी केले.

Exit mobile version