शेकापचे माजी आ. राऊ धोंडी पाटील यांचे निधन


अलिबाग | शहर प्रतिनिधी |
कोल्हापूर शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आ.राऊ धोंडी पाटील यांचे निधन झाले. वृत्त कळताच रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षातर्फे श्रध्दांजली वाहण्यात आली आहे.राऊ धोंडी पाटील हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जात होते.विधीमंडळातही त्यांनी अनेक प्रश्‍नांना वाचा फोडली.शिवाय शेकापतर्फे करण्यात आलेल्या विविध आंदोलनात हे स्वयंस्फूर्तीने अग्रणी राहिले होते.

Exit mobile version