उपसरपंचपदी गणेश पाटेकर विराजमान
| पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये शेकापने स्वबळावर वर्चस्व प्रस्थापित केले असून, इतर तीन ग्रामपंचायतींमध्ये युतीमधून उमेदवार निवडून आणले. 14 ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी चंदरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सखाराम पांडू मरकड, उपसरपंचपदी गणेश किसन पाटेकर, सदस्य रामा गोविंद मरकड, सदस्या संगीता सदानंद कोलिस्टे यांनी पदाचा पदभार स्वीकारताना शेकापच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
रायगड जिल्हा शेकाप नेते तथा जि.प सदस्य सुरेश खैरे यांनी चंदरगाव ग्रामपंचायतीत उपस्थित राहून नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांना सुभेच्छा दिल्या. यावेळी निरीक्षक शिलोडकर सर, सदस्या बारकी हरिभाऊ हिलम, ग्रामसेविका चेतना पाटील, सदस्या दर्शना दत्ता चव्हाण, शेकाप पुरोगामी संघटनेचे ता.अध्यक्ष अतिष सागळे, गजानन भोईर, सुधीर भांबलकर, भालचंद्र पार्टे, किसन पाटेकर, दत्ता पाटेकर, संतोष आरडे, वसंत पाटेकर, तुळाजी मटकर, बाळू गोरीवले, दत्ता घोगले, भरत यादव, देवराम यादव, दगडू चव्हाण, अविनाश यादव, रमेश यादव, पिठू चव्हाण, धनेश गोरीवले, जितेंद्र गोरीवले, पांडुरंग वनगले, तुकाराम जोध, इकल्या पवार, रघु मरकड, संजय मांडे आदींसह मान्यवर व बहुसंख्येने पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.