। केज । प्रतिनिधी ।
आंबेजोगाई कळंब महामार्गावर शेकापक्षाकडून एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनात ओला दुष्काळ जाहीर करून 50 हेक्टरी नुकसान भरपाई द्या. शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करा. ऊस उत्पादक शेतकऱ्याची पंधरा रुपये कपात थांबवा. लाडकी बहीण सारख्या बळच लादलेल्या योजना बंद करा. पिक विमा सरसकट द्या, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आला होता. सरकारने भांडवलदाराची दलाली थांबवावी आन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांनी इशारा दिला. यावेळी उमाकांत आप्पा भुसारी, रुपेश बोरगावकर, भाई मंगेश देशमुख भाई महेश गायकवाड, जयराज निशिगंध, सचिन उजगरे भाई रचलिंग पाटील प्रभुलिंग निगडीकर ओमकार लामतुरे राहुल इंगळे गणेश खानवरे, मयूर सुरवसे दीपक नांदे, दादा निकम उत्तरेश्वर खरबड जयराज मुकदम विकास जाधव, विजय शिंदे आदीसह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आंबेजोगाई कळंब महामार्गावर शेकापचा रास्ता रोको आंदोलन
