। अलिबाग । प्रतिनिधी ।
वारंवार निवेदन देऊनदेखील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक होत आज (दि.7) पेझारी चेक पोस्ट येथे रास्ता रोको आंदोलन केले. सकाळी 9 वाजल्यापासून रस्त्यावर ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दाखवली.





