शेकापचा गरिबांना आधार

चित्रलेखा पाटील यांची सामाजिक बांधिलकी

| अलिबाग | प्रतिनिधी |

तीन लाख गोरगरीबांना मोफत चष्मे वाटपाचा संकल्प घेत शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत गावागावात नेत्र तपासणी, चष्मे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. अलिबाग तालुक्यातील पेझारीमध्ये मोफत नेत्र चिकित्सा व चष्मे वाटप करण्यात आले. या उपक्रमात पेझारी परिसरातील असंख्य लाभार्थ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी माजी आमदार पंडित पाटील, मा. जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील, पेझारी ग्रामपंचायत सरपंच प्राजक्ता म्हात्रे, उपसरपंच ॲड. मनोज धुमाळ, माजी सरपंच विजय पाटील, माजी सरपंच अंबरनाथ पाटील, मोहन म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य, तरुण, ज्येष्ठ ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना चष्म्याचा खर्च न परडवणारा आहे. गोरगरीबांना चष्म्याचा आधार देण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रेलखा पाटील करत आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिक, मध्यमवर्गातील मंडळी सकाळपासून नेत्र तपासणीसाठी आले होते. नोंदणीसह तपासणीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. जिल्हा रुग्णालय आणि लायन्स क्लबच्या टीमच्या सहकार्यातून प्रत्येकाच्या डोळ्यांची तपासणी करून त्यानुसार त्यांना मोफत चष्मे देण्यात आले.

Exit mobile version