| पाताळगंगा | प्रतिनिधी |
ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी मेंढपाळांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात आगमन जरी होत असले तरी सुद्धा चाऱ्याच्या आभावाने मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागत आहे. ही वस्तूस्थिती सध्या तालुक्याच्या ठिकाणी निर्माण झाली आहे. पुर्वी कोकणात मोठ्या प्रमाणात चारा असायचा, मात्र गेल्या काही वर्षात औद्योगिकरणांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरल्याने, शिवाय जंगले नामशेष होत असल्यामुळे, त्याच बरोबर पावसाला संपताच वणवे मोठ्या प्रमाणात लागले जात असल्यामुळे, या सर्व कारणावरुन मेंढ्यावर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. त्याच बरोबर पिण्याच्या पाण्याच्या समस्या मोठ्या तीव्रतेने जाणवत आहे. पुर्वी माळरान आणी डोंगराच्या परिसरात काटेरी वनस्पती मोठ्या प्रमाणात असायचे, हेच अन्न म्हणून शेळ्या, मेंढ्या भक्षण करीत असे, यामुळे दुध उत्पादन वाढ होत होती. मात्र, चाऱ्याच्या अभावाने आम्ही आर्थिक संकटात सापडत आहोत असे मेंढपाळाने सांगितले.
चाऱ्याच्या शोधात मेंढपाळांची भटकंती
