आ.जयंत पाटील यांची विशेष उपस्थिती
। माणगाव । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दक्षिण रायगडमधील चार शाखांचे स्वमालकीच्या जागेत सुसज्ज फर्निचरसह शुक्रवारी (18 नोव्हेंबर) स्थलांतर होत आहे. बँकेचे चेअरमन आ.जयंत पाटील यांच्या हस्ते आणि व्हाईस चेअरमन सुरेश खैरे, सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत माणगाव,विन्हेरे विशेष कक्ष (नागाव), पोलादपूर आणि बिरवाडी या चार शाखांचे नूतन वास्तूत स्थलांतर करण्यात येणार आहे.
आरडीसीसी बँक ही ग्राहकांचे हित जपणारी आणि गुणवत्तापूर्वक सेवा देणारी बँक ओळखली जाते. कोवर बँकिंग सुविधा, आरटीजीएस, एनइएफटी सेवा, केसीसी डेबिट कार्ड व एटीमकार्ड अशा अनेक सेवा या बँकेत ग्राहकांना पुरविल्या जात आहेत. या बँकेने सहकारी क्षेत्रात गरुडभरारी घेऊन केवळ रायगड जिल्ह्यातच नव्हे तर राज्य, देश व सातासमुद्रापलीकडे नावलौकिक मिळविला आहे. रायगड जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातील अग्रगण्य असणार्या या बँकेने अनेकांना कर्जाचा पुरवठा करून रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.
माणगाव येथील कार्यक्रम सकाळी 10 वाजात रॉयल प्लाझा,तळमजला,माणगाव- मोर्बा रोड येथे होणार आहे.या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन संचालक अस्लम राऊत,ज्ञानेश्वर भोईर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, विभागीय अधिकारी संजीव देशमुख,शाखा व्यवस्थापक समीर देशमुख यांनी केले आहे. विन्हेरे विशेष कक्ष(नागाव) शाखेचे स्थलांतर सकाळी 11.30,पोलादपूर शाखा 12.30 वाजता तर बिरवाडी शाखेचे स्थलांतर दुपारी 1.30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत केले जाणार आहे.या कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन संचालक वसंत सकपाळ,एकनाथ गायकवाड,प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक,विभागीय अधिकारी संजीव देशमुख,विन्हेरे शाखाधिकारी नितीन चांदोरकर,पोलादपूर शाखाधिकारी संजीव जगताप, बिरवाडी शाखाधिकारी दिलीप तांबे आदींनी केले आहे.
बँकेचे कार्यतत्पर चेअरमन आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रकारे या बँकेच्या सर्वच शाखांमध्ये कामकाज सुरु आहे. अनेक पुरस्कार या बँकेला मिळालेले आहेत. बँकेच्या माणगाव शाखेचे कामही उत्तम प्रकारे सुरु आहे. या बँकेच्या माणगाव शाखेचे स्वमालकीच्या नवीन जागेत स्थलांतर होत असल्याने बँकेच्या सर्व संचालक मंडळाबरोबरच बँकेचे खातेदार, ठेवीदार, हितचिंतक या सर्वांनाच आनंद होत आहे.
या कार्यक्रमास सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बँकेचे संचालक अस्लम राऊत, संचालक ज्ञानेश्वर भोईर, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, माणगावचे शाखा व्यवस्थापक समीर देशमुख, विभागीय अधिकारी माणगाव विभाग संजीव देशमुख व माणगाव शाखेच्या सर्व कर्मचारी वृंद व स्वल्पबचत प्रतिनिधी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.