एल अँड टी नागोठणे प्रकल्पात शिमगा; परप्रांतीय व स्थानिकांत तुंबळ हाणामारी

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

रिलायन्स टाऊनशीप गेटसमोर एल अँड टी प्रकल्पामध्ये वसाहत निर्माणाचे काम सुरू झाले आहे. या शुक्रवारी स्थानिक आणि परप्रांतीय यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. याबाबतचे व्हीडीओ व्हायरल झाल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे.


ऐन पावसाळ्यात कंपनीने या प्रकल्पाचे काम सुरु केलेले होते. अतिवेगात सुरू असलेल्या प्रकल्प उभारणीच्या कामात स्थानिक व परप्रांतीय असा वाद सुरवातीपासूनत राहिला आहे. एल अँड टी नागोठणे प्रकल्पात ऐन शिमग्यात शिमगा पहावयास मिळाले, याठिकाणी परप्रांतीय व स्थानिक कामगारात तुंबळ हाणामारी झाली, धक्कादायक म्हणजे उंच इमारतीच्या स्लॅबवर पाईप, सळ्या, लाकूडफाट्याने भय्ये व स्थानिक यांच्यात हाणामारी झाली, नशीब बलवत्तर म्हणावे की काय या तुंबळ हाणामारीत इमारीतीवरून कुणी खाली पडले नाही.

इमारतीचे स्लॅबचे काम सुरू असताना दोन गटांत तुफान राडा झाला. बघताबघता परप्रांतीय पेटून उठले व एकमेकांना संपवून टाकावे इतकी आक्रमकता त्यांनी अवलंबली. या वादात अनेकजण रक्तबंबाळ झाले, तर कित्येकांच्या डोक्यात, पाठीत मुकामार लागला. अनेकदा प्रकल्पात झालेले वाद आतल्या आत दाबले जातात, मात्र या तुंबळ हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि भैय्यांची दादागिरी पाहून स्थानिक प्रचंड संतापले. भैय्यांना आवरा नाहीतर गाठ आमच्याशी आहे, असे स्थानिक म्हणू लागले. स्थानिकांना या प्रकल्पात सहजासहजी एन्ट्री मिळत नाही, मात्र परप्रांतीय भैय्यांना इथं हमखास रोजगार मिळतोय अशी परिस्थिती दिसून येते.

सदरचा प्रकल्प हा नागोठणे पोयनाड मार्गावर सुरू असून या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय भैयाना संधी देण्यात आलीय. याचाच फायदा परप्रांतीयांनी उठवला आणि झोडपून काढले. त्यामुळे येथील स्थानिक तरुण कामगारांचे आईवडील, पालक चिंतातुर झाले आहेत. आपला मुलगा कामावर जातोय खरा परंतु तो सुखरूप घरी परतेल का? याची चिंता आता त्यांना सतावू लागली आहे. सद्यस्थितीत हा वाद नेमका कशामुळे झाला यामध्ये नेमके किती कामगार जखमी झाले हे अद्याप समोर आले नाही. मात्र हाणामारीचा व्हिडीओ पाहता अनेकजण जखमी झाल्याचा अंदाज वर्तविला जातोय. नबील कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून काम करणारे परप्रांतीय कामगार व बेणसे झोतिरपाडा विभागातील कामगार यांच्यात हा वाद झाला असून आजघडीला वादात सहभागी असलेले परप्रांतीय कामगारांना पिटाळून लावले असल्याचे समजते.

यासंदर्भात रिलायन्स प्रशासन व एल अँड टी व्यवस्थापनाच्या प्रमुख अधिकारी यांना प्रतिक्रियेसाठी मोबाईल वरून वारंवार साधला असता कॉलला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नेमकी कंपनीची बाजू कळू शकली नाही.

Exit mobile version