असंख्य कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शिंदे गटातील शिवसेनेच्या मनमानी कारभाराला कंटाळून कुर्डूसमधील कामतवाडी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे. शेतकरी कामगार पक्षात गेल्या अनेक दिवसांपासून इनकमिंग सुरु झाली आहे. त्यामुळे शिंदे गटाला दणका मिळत असल्याचे चित्र आहे.
शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, आत्माराम पाटील, मो.रा. म्हात्रे, विलास म्हात्रे, अमोल पिंगळे, संतोष पिंगळे, अतुल पाटील आदी पदाधिकारी, खारेपाट विभागातील ज्येष्ठ व तरुण कार्यकर्ते व नवनिर्वाचित कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना शिंदे गटामध्ये कुर्डूसमधील कामत ठाकूरवाडीमधील ग्रामस्थ व महिला काम करीत होते. परंतु, त्यांची घोर निराशा करण्यात आली. अखेर शिंदे गटातील मनमानी कारभाराला कंटाळून कामतवाडीमधील असंख्य कार्यकर्त्यांनी शेकापमध्ये प्रवेश केला. तळागाळातील कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन जाहीर पक्ष प्रवेश केला. शिंदे गटातील असंख्य कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करीत आहेत. या प्रवेशामुळे शिंदे गटामध्ये भगदाड पडू लागले असल्याची चर्चा आहे. कामतवाडी येथील ग्रामस्थ व महिलांच्या पक्ष प्रवेशामुळे शिंदे गटाला दणका मिळाला आहे.
