पोलादपुरात शिंदे गटाचे वर्चस्व

4 पैकी 3 सरपंचपद बाळासाहेबांची शिवसेनाकडे
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी पहिल्या टप्प्यातील तुर्भे खोंडा, तुर्भे खुर्द, तुर्भे बुद्रुक आणि वझरवाडी या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीने सुरू झाली. निवडणुकीमध्ये बाळासाहेबांची शिवसेनाकडे तीन सरपंचपदं आली असून, महाविकास आघाडीनेही लोहारे पुलापलीकडे प्रवेश करण्यासाठी यश मिळविले आहे.

तुर्भे खोंडा सरपंचपद शिंदे
गटाचे अन् बिनविरोध सदस्यही

तुर्भे खोंडा येथे सरपंच पदासाठी शिंदे गटाच्या कविता केशव खेडेकर (108 मते) यांनी मविआच्या प्रमिला प्रमोद महाडिक (101 मते) यांच्यावर विजय मिळविला असून, या ग्रामपंचायतीमधील दीपक खेडेकर, चैताली गोळे, अश्‍विनी जाधव, निर्मला देवळेकर, रामचंद्र खेडेकर, अनिता गायकवाड, गोपाळ खेडेकर हे सात सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार शिंदे गटाचे बिनविरोध विजयी झाले आहेत.

वझरवाडीमध्ये मविआचे चार सदस्य आणि सरपंच शिंदे गटाचा
तालुक्यातील प्रगतशील ग्रामपंचायत असलेल्या वझरवाडीमध्ये सरपंच पदाच्या थेट लढतीमध्ये संभाजी जाधव (329 मते)यांनी मविआचे उमेदवार श्रीहास शिंदे (285 मते)यांचा पराभव केला. प्रभाग 1 मध्ये सर्वसाधारण जागेसाठी कृष्णा जाधव (111 मते)यांचा केशव शिंदे (157 मते विजयी) यांनी पराभव केला. सर्वसाधारण स्त्री या दोन जागांसाठी रेश्मा उतेकर (133 मते), अश्‍विनी चव्हाण (148 मते विजयी), मेघा जाधव (110 मते), वंदना जाधव (143 मते विजयी) यांच्यामध्ये लढत झाली. प्रभाग 2 मध्ये सर्वसाधारण जागेसाठी विठ्ठल उतेकर (92 मते विजयी) विरूध्द सखाराम जगताप (79 मते) तर सर्वसाधारण स्त्री जागेसाठी भारती चव्हाण (79 मते) विरूद्ध श्रद्धा चव्हाण (93 मते विजयी) अशी लढत झाली. प्रभाग 3 मध्ये सर्वसाधारण जागेसाठी सखाराम चव्हाण (32 मते) विरूद्ध रोहित जाधव (140 मते विजयी) तर सर्वसाधारण स्त्री जागेसाठी संगिता घोलप (150 मते विजयी) विरूद्ध अंजली वायकर (22 मते) यांची लढत झाली. वझरवाडीमध्ये महाविकास आघाडीचे 4 तर शिंदे गटाचे सरपंच आणि 3 सदस्य विजयी झाले आहेत.

तुर्भे बुद्रुकमध्ये 3 बिनविरोध 9 रिंगणात
तुर्भे बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी सुरेखा गोळे (319 मते विजयी) यांनी निशा शेलार (177 मते) यांच्यावर मात केली. प्रभाग 1 मध्ये सर्वसाधारण स्त्री या एका जागेसाठी पूजा गोळे (132 मते विजयी), किरण गोळे (116 मते) आणि संचिता बेलोसे (52 मते) अशी लढत झाली. प्रभाग 1 मध्ये राजेश साळवी हे अनुसूचित जातीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. प्रभाग 2 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गात हेमंत गोळे व सर्वसाधारण स्त्री प्रवर्गामध्ये मंगल गोळे हे बिनविरोध विजयी झाले. प्रभाग 3 मध्ये रेश्मा मरगजे (132 मते विजयी) यांनी सुवर्णा शेलार (52 मते) यांच्याविरूध्द सर्वसाधारण स्त्री जागेवर विजय मिळवला. सर्वसाधारण जागेसाठी विकास शिंदे (67 मते) यांच्यावर अशोक शेलार (89 मते विजयी) यांनी मात केली. तुर्भे बुद्रुकमध्ये शिंदे गटाकडे सरपंच 3 सदस्य आणि 1 बिनविरोध, तर भाजपला आणि काँग्रेसला एक-एक सदस्य बिनविरोध मिळाला आहे.

तुर्भे खुर्दमध्ये श्रीराम विकास आघाडीचा सरपंच
पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खुर्द येथे सर्वसाधारण सरपंचपदासाठी गोविंद उतेकर (338 मते विजयी) यांनी तुकाराम उतेकर (281मते) यांच्यावर विजय मिळविला. प्रभाग 1 मध्ये सर्वसाधारण जागेसाठी अविनाश उतेकर (151 मते विजयी) विरूध्द ओंकार उतेकर (148 मते) तर सर्वसाधारण स्त्री या दोन जागांसाठी प्रणिता उतेकर (127मते) यांचा रेणुका उतेकर (178 मते विजयी) यांनी पराभव केला तर सुरेखा उतेकर (109 मते) यांचा रंजना मोरे (173 मते विजयी) यांनी पराभव केला आहे. प्रभाग 2 मध्ये सर्वसाधारण जागेसाठी ओमकार उतेकर (127 मते विजयी) यांनी संजय जाधव (39 मते) यांना पराभूत केले असून, सर्वसाधारण स्त्री जागेसाठी सुमिता उतेकर (54 मते) यांना चंद्रभागा दळवी (114 मते विजयी) यांनी पराभूत केले आहे. प्रभाग 3 मध्ये सर्वसाधारण जागेसाठी राजेश उतेकर (81 मते विजयी) यांनी विशाल उतेकर (72 मते) यांचा पराभव केला तर याच प्रभागातील सर्वसाधारण स्त्री जागेसाठी उषा उतेकर (84 मते विजयी) यांनी गुलाब उतेकर(69मते) यांचा पराभव केला. शिंदे गटाला 2 तर श्रीराम विकास आघाडीला सरपंच पदासह 5 सदस्य जिंकता आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पोलादपूर तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निकालामुळे शिंदे गटाचे वर्चस्व स्पष्ट झाले असले तरी लोहारे पुलापलिकडे श्रीराम विकास आघाडीने मिळवलेले यश आणि काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचा शिरकाव बर्‍यापैकी मतविभाजन करण्याची क्षमता बाळगून असल्याचे दिसून येत आहे. पोलादपूर तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या निकालानंतर तणाव निर्माण झाल्याने पोलादपूर तालुक्यात पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले.

Exit mobile version