। मुंबई । प्रतिनिधी ।
उद्धव ठाकरे गटाला आव्हान देण्यासाठी आता शिंदे गट मुंबईत नवे शिवसेना भवन उभारणार आहे. दादरमध्येच हे नवे भवन उभारले जाणार असल्याची माहिती सदा सरवणकर यांनी दिली आहे. यावरुन सातत्याने शिंदे गट ठाकरेंना दणका देत असल्याचे दिसून येत आहे.
याबद्दल शिंदे गटाचे आ. सदा सरवणकर यांनी सांगितले की, आज एक आाभास निर्माण केला जात आहे की, मुंबईवर ठाकरे गटाचे राज्य आहे. मुंबईतील जनतेची, शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंवर नाराजी आहे. कारण ते मुख्यमंत्री असताना कोणतीही कामे झाली नाहीत. एकाही बेरोजगाराला नोकरी मिळाली नसल्याची टीकाही त्यांनी केली.
यापुढे ते म्हणाले, आता लवकरच स्वतंत्र शाखा उभारल्या जातील. शाखाप्रमुखांची घोषणा होईल. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे काम जोरदार सुरू होईल. त्यांच्या कामाची गती पाहता त्यांना चांगल्या कार्यालयाची गरज आहे. त्यामुळे दादरमध्येच त्यांचे एक मुख्य कार्यालय असेल. त्यांच्या नेतृत्वाखाली इतर शाखा काम करतील. अशी माहितीही त्यांनी दिली.