शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहिर; ठाकरेंना धक्का

। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने आणखी एक धक्का दिला आहे. शिंदे गटाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. या नव्या कार्यकारिणीमध्ये नव्याने सर्व पदांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेतील प्रमुखपद जे नेहमीच खास राहिलं आहे. त्या शिवसेना प्रमुख किंवा शिवसेना पक्षप्रमुख या पदाबाबत मात्र कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही. एकूणच असं कोणतंही नवं पद या गटानं तयार केलेलं नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या गटाची सोमवारी (18 जुलै) हॉटेल ट्रायडंट इथं बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेचे 14 खासदारही उपस्थित होते. यामध्ये शिवसेना मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड, दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी, नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर उपनेतेपदी उदय सामंत, गुलाबराव पाटील, यशवंत जाधव, शिवाजीराव अढळराव पाटील, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा यांनी निवड करण्यात आली आहे. तर लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे हे कायम राहणार आहेत.

शिवसेना खासदारांच्या मनात सुरू असलेली खदखद लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा दिला. त्यानुसार राष्ट्रपतीपदासाठीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पण या मतदानानंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या 12 खासदारांनी शिंदे गटाच्या बैठकीला हजरी लावल्याची माहिती समजत आहे.

माध्यमात दाखवण्यात आलेला हा प्रकार कॉमेडी एक्सप्रेस सिझन 2 असून, कॉमेडी एक्सप्रेस सिझन 1 हा विधीमंडळात झाला आहे. ज्यावर 20 तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी स्थापन केलेल्या खंडपीठापुढे फुटीर गटाच्या भवितव्यासंदर्भाचा निर्णय लागेल. संजय राऊत,खासदार

Exit mobile version