कर्जत । वार्ताहर ।
मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाचे चीफ कमर्शियल इन्स्पेक्टर शिरीष कांबळे यांची गणना एक होतकरू व कार्यक्षम निरिक्षक म्हणुन नेहमीच केली जाते.बारा श्रमिक स्पेशल गाड्यांमधे प्रवासी व्यवस्थेचे कार्य त्यांनी आपल्या कार्यकौशल्याने उत्तम प्रकारे हाताळले.
माथेरानची राणी म्हणुन जगप्रसिद्ध असलेली मिनी ट्रेन पुन्हा चालु करण्यासाठी स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि रेल्वे अधिकारी यांच्यामधे समन्वय साधुन ही गाडी पुन्हा चालू करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान मिळाले. त्यांना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्याकडुन विशेष कार्य केल्याबद्दल प्रशस्तीपत्रक मिळाले असुन त्यांनी केलेल्या उत्कृष्ठ कार्य कौशल्याची दखल घेत रेल्वे प्रशासनातर्फे या वर्षीचा डिआरएम पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला.