| रेवदंडा | प्रतिनिधी |
ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या शितळादेवीच्या वर्धापन दिनानिमित्त फाल्गुन शुद्ध दुर्गाष्टमी, मंगळवार (दि.24) फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. वर्धापन दिनानिमित्त पहाटे सकाळी 5.30 वाजता देवीचा स्नानविधी होणार असून पारंपरिक विधी-विधानांनुसार पूजाअर्चा केली जाणार आहे. गावातील ग्रामस्थ तसेच बाहेरगावाहून येणारे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मंदिर परिसरात स्वच्छता, सुव्यवस्था व भाविकांच्या सोयीसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. हा वर्धापन दिन सोहळा श्री शितळादेवी जिर्णोद्धार मंडळ व ग्रामस्थ मंडळ, चौल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. परंपरा, श्रद्धा आणि भक्तिभावाचा संगम असलेला हा सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महापर्वणीच्या या पावन दिवशी सर्व भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.







