| अलिबाग | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अलिबागमध्ये साजरी केली जाणार आहे. मावळा प्रतिष्ठान आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा अलिबागमध्ये होणार आहे. या निमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. यावेळी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्यासह मावळा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक अलिबागचे वीज व सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापतीपदी प्रशांत नाईक, रघुजी राजे आंग्रे, अलिबागच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.
अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 18 फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजता गारद होणार आहे. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता, चरणस्नान, दुपारी तीन वाजता, शहरातील ब्राह्मणआळी येथील श्रीराम मंदिर येथे मिरवणूक मावळे फेटे बांधणी, सायंकाळी चार वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी साडेसात ते आठ या वेळेत लाठीकाठी व मर्दानी खेळ आदी कार्यक्रम होणार आहेत. तसेच गाज फाऊंडेशन व मनस्वीनी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित प्रतापगड पर्व हा कार्यक्रम होणार आहे.
उद्या अलिबागमध्ये मावळा प्रतिष्ठान तर्फे शिवजन्मोत्सव सोहळा
