जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी

| अलिबाग | वार्ताहर |

शिवजयंतीनिमित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी अभिवादन केले. यावेळी माजी नगरसेविका वृषाली ठोसर, राकेश चौलकर, अनिल चोपडा, रवी थोरात उपस्थित होते.

नेरळमधील शिवप्रेमी तरुणांची शिवदौड

नेरळ सार्वजनिक शिवजंयती उत्सव समिती आणि शिवज्योत दौड यांच्या माध्यमातून तिथी प्रमाणे येणार्‍या शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवज्योत दौडचे आयोजन केले जाते.

ही शिवज्योत दौड शनिवारी (दि.15) शाम कडव यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यातील विश्रामदुर्ग (चाकणचा किल्ला) या किल्ल्यावर स्थानिक ढोलपथक व शिवकालीन शस्त्राच्या धाडसी सादरीकरणाने ज्योतीला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर किल्ले विश्रामदुर्गावर शिवआरती करून शिवदौड निघाली आणि सोमवारी (दि.17) सकाळी नेरळ येथे पोहोचली. या शिवदौडमध्ये श्याम कडव, प्रथमेश कर्णिक, तुषार भोईर, भूषण भोईर, जीवन भोईर, सिद्धेश भोईर, कुणाल कांबरी, कामेश कांबरी, दुर्वांकुर पवार, संतोष राठोड, राजेश हाबळे, सुदर्शन भोईर, श्याम कडव, शुभम कडू, चिराग कडू, शिरीष भोईर, हृतिक गवळी, प्रशांत गवळी आदी तरुणांनी सहभाग घेतला होता.

शिवज्योतीचे मुरुडमध्ये भव्य स्वागत

मुरुड खारआंबोळी येथील शिवप्रेमी मित्र मंडळाच्या युवकांनी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर प्रज्वलित करण्यात आलेली शिवज्योत मुरुड शहरात आणली. या उपक्रमात 200 युवकांसह 10 महिलांना सहभाग घेतला होता. या शिवज्योतीचे मुरुडकरांनी उत्सहात स्वागत केले.

शिवज्योत मुरुड बाजारपेठेत पोहोचताच पद्मदुर्ग ढोल पथकांनी सलामी दिली. तसेच, शिवभक्तांनी शिवगर्जना देत ती ज्योत घेऊन मुरुड शहरासह पालिकेतील शिवरायांच्या प्रतिमेला हार घालून खारआंबोली येथे नेण्यात आली. यावेळी शिवप्रेमी मित्र मंडळाचे चिंतामणी बेडेकर, गणेश गोसावी, संकेत म्हात्रे, अक्षय बेडेकर, दीपेश पेरवे, मंगेश खंडागळे आदींनी सहभाग घेतला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तळोजा फेज 1 मध्ये मोठ्या उत्साहत साजरी करण्यात आली. यावेळी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. कमळ गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था, बबन दादा पाटील सामाजिक विकास मंडळ व सर्व पक्षीय ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते. त्याचबरोबर ढोल ताशा आणि विद्यार्थ्यांची लेझीम पथके सहभागी झाले होते.

शिवजयंतीनिमित्त अलिबाग येथिल कुलाबा क्रीडा प्रबोधनीच्यावतीने कोल्हापूर येथील पन्हाळा गडावरून अलिबाग येथे शिवज्योत आणण्यात आली. यामध्ये कुलाबा क्रीडा प्रबोधनीचे संस्थापक यतीराज पाटील यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

चिरनेर गावात शिवरायांचा जयजयकार

उरण तालुक्यातील ग्रामस्थ मंडळ चिरनेर, रांजणपाडा व चिंचपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोमवारी (दि.17) येथील शिवाजी चौकात साजरा करण्यात आला.

यावेळी ‘हर हर महादेव’, ‘जय भवानी’, ‘जय शिवराय’ अशा जयघोषांत परिसर दणाणून गेला होता. तसेच, हृदयी पाटील या पाच वर्षाच्या शिवकन्येने शिवरायांचे सुरेख व समर्पक असे वर्णन केले. त्यामुळे शिवरायांचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक सोहळा त्याचबरोबार प्रकाश पाटील यांचे शिवबांच्या जन्मोत्सवाचे किर्तन व पाळणा गीत सादर करण्यात आले. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची चिरनेर गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.

किल्ले रायगड ते कडाव शिवज्योत

शिवज्योत उत्सव मंडळ आणि सुदाम पवाळी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीच्या निमित्ताने कडाव येथे भव्य शिवज्योत दौडचे आयोजन करण्यात आले.

यंदा शिवभक्तांनी किल्ले रायगड येथुन पायी शिवज्योत आणण्याचा संकल्प केला होता. यावेळी मोठ्या उत्साहात शिवभक्तांनी रायगडावरून कडाव अशी शिवज्योत आणण्यात आली. मुख्य आयोजक सुदाम पवाळी यांनी रायगडावरील होळीच्या माळावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून शिवज्योत रविवारी (दि.16) सायंकाळी कर्जत कडे निघाली.ही शिवज्योत गोवा-पनवेल राष्ट्रीय महामार्गावरून वाकण फाटा, पाली करत खोपोली येथे आणण्यात आली. साधारण 150 किलोमीटर अंतर पार करून हि शिवज्योत सोमवारी (दि.17) सकाळी कडाव येथे पोहचली.

कोलाड हेटवणे येथे शिवजयंती साजरी

जय बजरंग क्रीडा मंडळ हेटवणे यांच्यावतीने तिथी प्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कोलाड पोलीस अधिकारी नितीन मोहिते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालत अभिवादन करण्यात आले.

शिवजयंतीनिमित्त शिव व्याख्यान जान्हवी पालकर (रातवड) तसेच महिलांचे कार्यक्रम हळदी कुंकू, संगीत खुर्ची आणि समीर शेडगे यांच्या हस्ते लहान मुलांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस नरेश पाटील, समिर शेडगे, दर्शन तेलंगे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शिवजयंती कार्यक्रम पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष अनिल निकम, उपाध्यक्ष अमीर तेलंगे यांच्यासह जय बजरंग क्रीडा मंडळाच्या सर्व सभासदांनी मेहनत घेतली.

ठाकरे गटातर्फे शिवरायांना अभिवादन

शिवजयंतीनिमित्त पनवेलमधील शिवसेना (उद्धव ठाकरे) शाखेतर्फे शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, शहर प्रमुख प्रविण जाधव, युवासेना जिल्हा प्रमुख पराग मोहिते, अच्युत मनोरे, राकेश टेमघरे, शहर संघटीका अर्चना कुळकर्णी, विभागप्रमुख प्रशांत नरसाळे, विभाग संघटीका अश्‍विनी देसाई, शाखाप्रमुख संतोष तळेकर, अरुण ठाकूर, मयुरेश दसवते आदी उपस्थित होते.



Exit mobile version