जिल्हाभर शिवजयंती उत्सव उत्साहात

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

तिथीनुसार साजरी करण्यात येणारा शिवजयंती उत्सव अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. शहरातील जोगळेकर नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान, महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आलेल्या टांझानिया देशाचे वाहतूक आणि दळणवळण मंत्री प्राध्यापक मकामे एम्बारवा, टांझानिया प्राधिकरणाचे संचालक प्लॅड्युस एम्बोसा आणि अन्य उच्चाधिकारी शिष्टमंडळानेदेखील प्रशांत नाईक यांच्यासमवेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक उपस्थित होते.

ठाकरे गटाकडून शिवजयंती उत्साहात
शिवसेना अलिबाग शहरातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी युवा नेते आमीर ठाकूर, अलिबाग शहरप्रमुख संदीप पालकर, संतोष ठाकूर, महिला तालुका संघटिका सौ. देवळेकर, शहर संपर्कप्रमुख संघटिका तनुजा पेरेकर, अलिबाग शहर संघटिका राखी खरवले, उपशहर प्रमुख वसंत जैन, अलिबाग वाहतूक सेना अध्यक्ष बाबूभाई सय्यद, युवासेना तालुका अधिकारी गिरीश शेळके, प्रशांत करमत तसेच अलिबाग शहरातील सर्व महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

Exit mobile version