अलिबागमध्ये ठिकठिकाणी शिवजयंती साजरी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अलिबागमध्ये ठिकठिकाणी सोमवारी साजरी करण्यात आली. यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक उपक्रमांसह समाज प्रबोधनाचे कार्यक्रम यावेळी शहरी भागासह ग्रामीण भागात घेण्यात आले.

अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, उमाकांत कडनोर, अलिबाग नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक अंगाई साळुंखे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी म जय जय महाराष्ट्र माझाफ मगर्जा महाराष्ट्र माझाफ या राज्यगीताचे अत्यंत उत्साहात गायन करण्यात आले.



त्यांतर जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागामधील तहसीलदार उमाकांत कडनोर यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार मनोज गोतारने तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

अलिबाग शहरामध्ये ठिकठिकाणी दुचाकी रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली. तरुणांसह अनेकांनी पारंपारीक पेहराव करीत, हातात भगवा झेंडा फडकवीत महाराजांचा जयघोष केला. त्यामुळे अलिबाग शहरासह ग्रामीण भाग महाराजांच्या जयघोषाने दुमदूमून गेला. गावांतील तरुणांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पोवाडयाचे सादरीकरण करीत महाराजांच्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम केले. एक वेगळा उत्साह व उमेद घेऊन अलिबागमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

Exit mobile version