| मुंबई | वृत्तसंस्था
मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात (वायव्य मुंबई) मागील निवडणुकीत मोदी लाटेत खासदार गजानन कीर्तिकर विजयी झाले होते. आगामी निवडणुकीत कीर्तिकर पिता-पुत्र आमने-सामने येतील, अशी चर्चा होती. त्यात ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजप युतीत हा मतदारसंघ शिंदे गटाला आला आहे. चित्रपट अभिनेते गोविंदा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने या मतदारसंघात गोविंदा यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांना गोविंदा यांचे मोठे आव्हान मिळण्याची शक्यता आहे.
2019 चे चित्र गजानन कीर्तिकर (शिवसेना) मते : 5,69,018 संजय निरुपम (काँग्रेस) मते : 3,09,517 सुरेश शेट्टी (वंचित बहुजन आघाडी) मते : 23,367 सुभाष पास (समाजवादी पक्ष) मते : 5,847 विजयी उमेदवारांचे मताधिक्य : 2,59,501






