खालापुरात शिवसेना महाविकास आघाडीची सरशी

शिंदे गटाचे उमेदवारच नाही, तर भाजपची प्रतिष्ठा संपुष्टात
। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यात चार ग्रामपंचयतींच्या या निकालात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोठी बाजी मारीत चारपैकी तीन ग्रामपंचयतींवर सरपंचासह सदस्य निवडून आणत शिंदे गट-भाजपचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. तर, एका ग्रामपंचायतीत भाजपने थेट सरपंचपद जिंकले असले तरी सर्वाधिक सदस्य उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने जिंकून वर्चस्व सिद्ध केले. बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाला मात्र या ठिकाणी उमेदवार न मिळाल्याने निवडणूक मैदानाच्या बाहेर राहावे लागले होते. त्यामुळे या चार पंचायतींमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप अशीच लढत झाली. चौक ग्रामपंचतीमध्ये शिवसेनेने भाजपला धूळ चारत एक सदस्यपद संपादन केल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

तालुक्यातील चौक, आसरे, लोधीवली व तुपगाव या चार ग्रामपंचयतींच्या निवडणुकीसाठी मतदान रविवारी झाले. त्यानंतर मतमोजणी सोमवारी खालापूर तहसील कार्यालयाच्या नेताजी पालकर सभागृहात पार पडली. चौक ग्रामपंचयतीत महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार रितू ठोबरे यांनी बाजी मारीत भाजपाच्या उमेदवार गायत्री कदम यांच्यावर 1659 मतांनी आघाडी घेत विजय मिळविला. या ठिकाणी भाजपाला पराभव दारुण पत्करावा लागला. तर, सदस्य पदासाठी प्रभाग 1 मध्ये लक्ष्मी अंकुश वाघ (611 मते, विजयी), प्रभाग 2 महादेव राघो पिरकोड ( 278 मते विजयी), निखिल संजय मालुसरे 289, प्राची प्रमोद दबके 296 प्रभाग 3 नयना आनंद झिंगे (518 मते, विजयी), सुभाष सीताराम पवार 315 प्रभाग 3 -रिना स्वप्नील सोनटक्के (481 मते), प्रभाग 4 अजिंक्य अशोक चौधरी 570, पूजा जगदीश हातमोडे 560, वृषली प्रसाद आंबवणे 517, प्रभाग 6 सीता संजु पवार 885, प्रभाग 7 सुवर्णा धनंजय राणे 808, स्वाती संतोष देशमुख 843 या उमेदवाराने विजय संपादन केल्याने या चौक ग्रामपंचयतीमध्ये एक जागा जिंकून भाजपाने खाते उघडले.

आसरे ग्राम पंचयती मध्ये थेट सरपंच पदाचे उमेदवार बळीराम जांभळे यांना 755 मते मिळाले तर भाजपाचे राम डुकरे यांना 541 मते मिळाल्याने बळीराम जांभळे यांनी 194 मताची आघाडी घेत विजय सापदन करीत भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला या ठिकाणी सदस्य पदी हरेश पंढरीनाथ दुर्गे 296 ,सुनिता रोहिदास पाटील 304,मेघा मंगेश जांभळे 367,सुमन शांताराम कातकरी 177 तर लोधिवली ग्रामपंचयतीमध्ये ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेने थेट सरपंच पूजा नितीन तवले यांना 1513 मते मिळाली, तर भाजपच्या इंदिरा बबन शितकंदे यांना 948 मते मिळाली. याठिकाणी पूजा तवले यांनी 565 मतांची आघाडी घेऊन भाजपचा पराभव केला.

तुपगाव ग्रामपंचयतीमध्ये मात्र भाजपने सरपंचपदाचे उमेदवार थेट सरपंचपदी रवींद्र लक्ष्मण कुंभार यांना 759 मते मिळाली, तर शिवसेनेचे भरत सदाशिव आपटेकर यांना 605 मते मिळाली असून, या तुपगाव ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचा पराभव करीत भाजपने सरपंचपदावर वर्चस्व केले आहे. मात्र, या ठिकाणी सदस्य शिवसेनेचे निवडून आले आहेत. चौक जि.प. वॉर्डाचे सदस्य मोतीराम ठोंबरे आणि सेनेचे सुधीर ठोंबरे यांनी गड राखल्याने विजयी उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा सहसंपर्क प्रमुख भाई शिंदे, विधानसभा संपर्क प्रमुख डॉ.सुनिल पाटील, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, उपजिल्हा महिला संघटक अनिता पाटील, मा.उपसभापती शाम साळवी, युवासेना उपजिल्हा प्रमुख निखिल पाटील, प्रशांत खांडेकर, प्रवीण मोरे,मा.सभापती कांचन पारंगे,काँग्रेसचे मा अध्यक्ष कृष्णा पारंगे आदि प्रमुखांसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version