| रोहा | प्रतिनिधी |
पुलवामा येथे भारतीय नागरिकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा देशाच्या अभिमानाला व सन्मानाला तडा देणारा प्रकार ठरला. अशा वेळी पाकिस्तान विरुद्ध कठोर भूमिका घेण्याऐवजी केंद्र सरकारकडून भारतीय क्रिकेट संघाला त्यांच्या विरोधात सामन्याची परवानगी देण्यात आली. या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवत शिवसेनेच्या वतीने रोह्यात आंदोलन करण्यात आले.
रोहा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या जाज्वल्य भावनेने या आंदोलनात सहभाग घेतला. रविवारी (दि.14) रोजी धाटाव येथील शिवसेना कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले. हातात भगवे झेंडे, अंगात उर्मी, चेहऱ्यावर देशभक्तीची जाज्वल्य भावना आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
आंदोलना प्रसंगी तालुकाप्रमुख नितीन वारंगे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, देशातील जवानांवर, नागरिकांवर हल्ले होत असताना पाकिस्तानला मैदानात खेळण्याची संधी देणं हे देशाच्या शहिदांचा अपमान आहे. असा निर्णय देशप्रेमी नागरिकांना कधीही मान्य होणार नाही. देशाच्या सन्मानासाठी आवश्यक तेव्हा शिवसेना रस्त्यावर उतरेल असे तालुका वारंगे यांनी सांगितले . या आंदोलनात रोहा तालुक्यातील सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, विभाग प्रमुख, उपतालुकाप्रमुख, शिवसेना युवा सैनिक, महिला आघाडी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलना दरम्यान परिसरात देशभक्तीच वातावरण निर्माण झालं होत.
रोह्यात शिवसैनिकांचे आंदोलन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606