माथेरानची शिवसेना ठाकरेंच्या पाठिशी

। नेरळ । प्रतिनिधी ।

माथेरानमधील शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहण्याचा घेतलेला निर्णय शिवसेना प्रमुखांविषयी आदरभाव वाढविणारा असल्याचा विश्‍वास शिवसेनेचे माथेरान शहरप्रमुख प्रसाद सावंत यांनी व्यक्त केला.

माथेरानमध्ये शिवसेना शाखेची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी असंख्य शिवसैनिकांनी उपस्थिती लावली. त्यावेळी ठाकरे यांचे विचार त्यांनी माथेरानमधील शिवसैनिकांवर रुजविले. त्यामुळे माथेरानमध्ये शिवसेना किती घट्ट रोवली आहे, याचा प्रत्यय आला. यानिमित्ताने माथेरान पालिकेवर मागील पाच वर्षे फडकत असलेला शिवसेनेचा भगवा खाली येणार नाही, असा विश्‍वास शहरसंपर्क प्रमुख कुलदीप जाधव यांनी व्यक्त केला.

शिवसेनेच्या माथेरान शाखेची बैठक येथील मधुमालती हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रसाद सावंत, कुलदीप जाधव, सागर पाटील, शकील पटेल, निमेश मेहता, तन्वी दिघे, अर्चना शिंदे, प्रेरणा सावंत, आप्पा कदम, गणेश कदम, बाबू सुतार, प्रदीप शिंदे, दत्त सरगर, प्रवीण पाटील, सुषमा जाधव, ज्योती सोनावले, सोनम दाभेकर, कीर्ती मोरे, माजी नगरसेवक नरेश काळे आदी उपस्थित होते.

Exit mobile version