नारायण राणेंचा माणगावात शिवसेनेकडून निषेध

माणगाव | वार्ताहर |
माणगावात तालुका शिवसेनेच्या वतीने मंगळवारी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुका प्रमुख गजानन अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नारायण राणे यांचा पोस्टरवर फोटो लावून त्यांचा कोंबडी चोर असा उल्लेख करीत संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त करून पोस्टरवरील नारायण राणे यांच्या फोटोला लाथा मारून फोटो फाडून निषेध केला.
यावेळी माणगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुजित शिंदे, तालुका युवासेना अधिकारी कपिल गायकवाड, शहर प्रमुख अजित तारलेकर, उपशहरप्रमुख अजिंकेश जाधव, इंदापूर विभाग प्रमुख विजय जाधव, विभागप्रमुख शरीफ हारगे, विश्‍वंभर दांडेकर,पोटणेरचे माजी सरपंच मनोज पडवळ आदींसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

Exit mobile version