शिवसेना तालुका प्रमुखच म्हणतात पक्ष न वाढलेला बरा…व्हिडिओ पहा

कुर्डूसच्या बैठकित नक्की काय म्हणाले राजा केणी?
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कुर्डूस येथील शिवसैनिकांच्या मेळाव्यात चक्क तालुकाप्रमुख राजा केणी यांनीच आमदारांच्या कार्यपद्धतीवर टीका करीत पक्षाचा प्रोटोकॉल पाळला जात नसल्याचा आरोप केला.तसेच कार्यकर्त्यांची कामे होत नसतील तर पक्ष वाढला नाही तरी चालेल, असे खोचक विधान केल्याने शिवसेनेतील खदखद बाहेर येत असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर राजा केणी यांचा राग अनावर झाला. त्यांनी वृत्तपत्र जाळून राग व्यक्त केला आणि सारे काही आलबेल असल्याचे सांगितले.

आढावा बैठकित शिवसेनेचे तालुका प्रमुख राजा केणी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आमदार व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा केवळ अलिबाग तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात सुरु होती. निवडणूक काळात दिलेल्या आश्‍वासनांची पुर्तताच होत नसल्याने अलिबागच्या शिवसेना आमदारांकडून जनतेसह शिवसैनिकांचा देखील भ्रमनिरास होत असल्याने नाराजीचे वातावरण पसरले आहे. मोठमोठी आश्‍वासने देत जनतेची दिशाभुल करीत आमदार झाल्यानंतर मात्र प्रत्यक्षात काहीच कामे होत नसल्याने मतदारांना आश्‍वासन देणार्‍या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तोंड दाखवणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे कट्टर शिवसैनिक दुखावले जात आहेत. जुन्या कार्यकर्त्यांची पक्षात घुसमट होत आहे.

Exit mobile version