खेडमध्ये जाहीर सभा, विरोधकांवर हल्लाबोल
| खेड | प्रतिनिधी |
शिवसेनेशी गद्दारी करणार्यांना गाडल्याशिवाय मतदार शांत बसणार नाही, सज्जड इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खेड येथे रविवारी दिला. शिवसेनेतील राजकीय घडामोडीनंतर प्रथमच झालेल्या जाहीर सभेत ठाकरे यांनी भाजप,निवडणूक आयोग,शिंदे सरकारवर शेलक्या भाषेत चौफेर टीका केली. शिवसेना संपविण्याचा प्रयत्न सर्व बाजुंनी होत असतानाही निष्ठावंत कार्यकर्ते पाठीशी असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलेे. आज माझ्या हातात काहीच नाही. मी देऊ शकत नाही. तरी तुम्ही माझ्यासाठी आला आहात. तुमची अशीच साथ मला हवी आहे. जे भुरटे आहेत, चोर आहेत, गद्दार आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही नाव, चिन्ह चोरू शकता पण शिवसेना चोरू नाही शकतं. तुम्हाला शिवसेनेचे धनुष्य पेलणार नाही. तिकडे रावण उताणा पडला होता. तिथे मिंधे काय उभे राहणार उद्धव ठाकरे म्हणाले.
मला निवडणूक आयोगाला सांगायचं की, तुमच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर येऊन पहावं शिवसेना कोणाकडे आहे. तो चुना लावणारा आयोग आहे. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयुक्तांच्या वडिलांनी नाही, माझ्या वडिलांनी केली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले की तुमचा अर्धा वेळ फिरण्यामध्ये जातोय, अर्धा वेळ मुजरा करायला आणि अर्धा वेळ ज्यांना खोकी मिळाली नाहीत, मंत्रीपदं मिळाली नाहीत त्यांना सांभाळायला जातो. सगळे उद्योग गुजरातला जातात, आता कर्नाटकात निवडणूक असल्याने आयफोनचा उद्योग तिकडे गेला. महाराष्ट्राला काहीच द्यायचं नाही, पण तुटलेल्या फुटलेल्या काचांच्या एसटीचे फोटो लावायचे आणि गतीमान महाराष्ट्र अशी जाहिरात करायची हेच यांचे उद्योग,अशी टीकाही त्यांनी उद्या होळी आहे,त्यानंतर धुळवड,आता माझ्या नावाने ते धुळवड साजरी करतील.पण त्यानंतर रंगपंचमी आहे.त्यावेळी फक्त आणि फक्त भगवा रंगच उधळून महाराष्ट्र भगवामय करावा,असे आवाहनही ठाकरे यांनी केले. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांचा आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला.
रामदास कदम भंपक- जाधव
आमदार रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रामदास कदम हे वेडे झाले आहेत की काय? त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. रामदास कमद भंपक आहेत. मुलाचा पराभव केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा भास्कर जाधव यांनी यावेळी बोलताना दिला. रामदास कदम हे झपाटलेल्या चित्रपटातील तात्या विंचू आहेत. रोज सगळ्या गावात फिरतात आणि सांगतात, उद्धव ठाकरेंनी मला संपवलं. खरे तर उद्धव ठाकरेंनी यांच्यासारखी बांडगुळं का बाळगली होती, काय माहिती. आदित्य ठाकरेंनी माझ्याबाजूला बसून रोज कामं घेतली. परंतु, ह्यांना साध पर्यावरण म्हणतात येत का?, असा सवाल जाधव यांनी रामदास कदमांना विचारला आहे.
शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी केलेली नाही, तर माझ्या केली आहे. कदाचित तिकडं वरती निवडणूक आयोगाचे वडील बसले असतील. मात्र, ते आयोगाचे वडील असतील, माझे नाही, – उद्धव ठाकरे,शिवसेना पक्षप्रमुख