। खेड । प्रतिनिधी ।
मुंबके ते कोरेगावदरम्यान गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी सापळा रचून पकडले. राहिद अब्दुल रऊफ जमादार (35) आणि मुरसलीन बशीर नाडकर (30) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. तपासादरम्यान दोघांकडून 162 ग्रॅम गांजा, दोन मोबाईल फोन आणि इतर साहित्य मिळून एकूण 22 हजार 445 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याबाबत पोलीस शिपाई विजेंद्र सातार्डेकर यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.







