धनुष्यबाणासाठी शिवसेनेचा 800 पानांचा ई-रिप्लाय

। मुंबई । प्रतिनिधी ।

शिवसनेचं धनुष्य बाण चिन्ह कुणाला मिळणार? यासाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार होती. यासंदर्भात उद्धव ठाकरे गटाने 800 पानांचा ई-रिप्लाय आज निवडणूक आयोगाला सादर केला आहे. ठाकरे गटाचे वकील सनी जैन यांनी प्रत्यक्षात निवडणूक आयोगाला रिप्लाय सादर करून ही माहिती माध्यमांना दिली आहे.

शिंदे यांच्या गटाकडून शनिवारी प्रत्यक्षात भेटून कोणतेही कागदपत्र सादर करण्यात आले नाहीत. तर एकनाथ शिंदे गट सातत्याने आम्हीच शिवसेना असून आमच्या बाजूने विधीमंडळ पक्षातील एकूण सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्य असल्याचं सांगत आहे. त्यामुळं शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळावं असा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाला अद्यापही आव्हान दिले गेलेले नाही. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ही बाब आपल्या याचिकेत मान्य केली आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला दिलेल्या याचिकेत युक्तिवाद केला आहे. त्यामुळे चिन्हाबाबतचा कुठलाही दावा पक्षप्रमुखांच्या परवानगीविना होऊ शकत नाही. मुख्य नेता या पदावर शिंदेंनी स्वतःला नेमलं आहे पण अशा पद्धतीचे कुठलेही पद शिवसेनेच्या घटनेत अस्तित्वात नाही, असा दावा देखील ठाकरे गटानं निवडणूक आयोगासमोर केला आहे.

Exit mobile version