शिवसेनेना शिवसंपर्क अभियान अलिबाग तालुक्यात निरुत्साह

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात मोठया उत्साहात होत असलेल्या शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात अलिबाग तालुक्यात मात्र निरुत्साह दिसून आला. जेमतेम ओढून ताणून कार्यकर्ते आणून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसमोर तालुक्यातील गटबाजीचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी पदाधिकार्‍यांनी आळशी पदाधिकार्‍यांमुळे पक्षाला मरगळ आली असून असे पदाधिकारी बदलण्याची गरज व्यक्त करीत घरचा आहेर दिला.
शिवसेनेचे नेते खासदार राजन विचारे, जिल्हा सपंर्क प्रमुख विलास चावरे यांच्या उपस्थितीत सदर शिवसपंर्क अभियान सुरु आहे. आज दुपारी दोन वाजता अलिबाग येथे राजमळा येथे या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात सायंकाळी 5 नंतर सुरु झालेल्या या अभियानासाठी कार्यकर्ते ओढूनताणून आणण्यात आले. पत्रकारांसमोरच कार्यकर्ते गोळा केली जात असल्याचे पाहून चर्चा होत होती. आमदार जिल्हा प्रमुख असलेल्या त्यांच्याच गावात शिवसंपर्क अभियानाचे बारा वाजल्याने शिवसेना पदाधिकार्‍यांमध्ये नाराजी दिसून येत होती. त्यामुळे झालेली भाषणातून देखील निरुत्साह दिसून येत होता

शिवसेना नेते अनंत गिते पोस्टरवरुन गायब
रायगड जिल्ह्यात शिवसेना वाढविणारे माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांना या शिवसपंर्क अभियानातून दुर ठेवण्यात आले आहे. त्याबाबत शिवसैनिकांनी देखील उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे. एका शिवसैनिकांने पदाधिकार्‍यांसोबत आपली नाराजी व्यक्त करताना स्पष्टपणे बॅनरवर अनंत गिते यांचे छायाचित्र नसल्याचे निदर्शनास आणून दिले. शिवसेनेला चांगले दिवस आणणारे अनंत गिते यांचाच विसर पडल्याने आश्‍चर्य व्यक्त केला जात आहे.

निरीक्षकांना मारले फाटयावर
शिवसंपर्क अभियानसाठी आलेल्या पक्षाच्या निरीक्षकांना जिल्हाप्रमुखांनी फाटयावर मारत कोणतेच सहकार्य करण्याचे नाकारले. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांना आणण्यासाठी वाहन देखील पाठवण्यासा टाळाटाळ करण्यात आल्याचे एका पदाधिकार्‍याने नाव न छापण्ययाच्या अटीवर सांगण्यात आले.

Exit mobile version