शिवस्मारक पर्यटकांसाठी होणार खुले

लाखो शिवप्रेमी, दासभक्तांची प्रतिक्षा संपणार
। उरण । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्राची मान उचावणार्‍या उरण येथील जेएनपीटीने 32 कोटी खर्चून उभारलेल्या व लाखो दासभक्तांना उत्कंठा लागून राहिलेले ऐतिहासिक भव्य दिव्य 20 मीटर उंचीचे शिवस्मारक पर्यटकांसाठी येत्या आठ दिवसांनंतर खुले करण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीटी वरिष्ठ प्रबंधक तथा सचिव जयंत ढवळे यांनी दिली.

उरण येथे जेएनपीटीने उभारलेल्या शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे मेमोरियल म्युझियम शिवस्मारकाचे तीस महिन्या पूर्वी लोकार्पण करण्यात आले आहे. विविध सुविधा असलेल्या अत्याधुनिक स्मारकाची मागील अडीच वर्षांपासून देशभरातील शिवप्रेमी, दासभक्त, पर्यटक आणि नागरिक आदी सर्वांनाच मोठी प्रतिक्षा लागून राहिली होती. कोव्हिड काळात बंद ठेवण्यात आलेले शिवस्मारक पर्यटकांसह सर्वासाठीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्यामुळे पर्यटकांकडून नाममात्र प्रवेश फी आकारणी करीत हे शिवस्मारक येत्या दहा दिवसातच पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीटी वरिष्ठ प्रबंधक तथा सचिव जयंत ढवळे यांनी दिली.

Exit mobile version