प्रीतम म्हात्रेंच्या हस्ते होणार नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन
| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील समृद्ध रंगभूमी लाभलेल्या गोवठणे येथील जय हनुमान नाट्य मंडळातर्फे गावदेवी भवानी मातेच्या यात्रेनिमित्त, शनिवार (दि. 26) एप्रिल रोजी शिवअलिंगन या शारदाकुमार शिर्सेकरांच्या ऐतिहासिक तीन अंकी नाटकाचे सादरीकरण गोवठणे रंगमंचावर रात्री दहा वाजता होणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक पांडुरंग पाटील यांचे या नाटकासाठी दिग्दर्शन लाभले आहे. नाटकाची निर्मिती लक्ष्मीकांत म्हात्रे यांची, तर नाटकाचे सूत्रधार सुरेश म्हात्रे हे आहेत. राजू म्हात्रे यांनी प्रासंगिक संगीत दिले आहे. पार्श्वगायन जितेंद्र म्हात्रे यांचे तर नाटकाचे सल्लागार रामनाथ म्हात्रे आहेत. नाट्यप्रयोगाचे उद्घाटन शेकापचे नेते प्रीतम म्हात्रे, दिग्दर्शक पांडुरंग पाटील तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
या नाटकात जिजामाता व बडी बेगम अशा दुहेरी व्यक्तिरेखा हेमांगी शैलेंद्र म्हात्रे या आपल्या अभिनयातून साकारणार आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज नरेंद्र वर्तक, अफजलखान कृष्णकांत म्हात्रे, नेताजी शैलेंद्र म्हात्रे, सय्यद बंडा निलेश म्हात्रे, पंताजी अशोक म्हात्रे, कृष्णाजीभास्कर प्रेम पाटील, कान्होजी जगन्नाथ वर्तक, खवासखान रुपम म्हात्रे, बहिर्जी आकाश पाटील, बाजी घोरपडे रोहन म्हात्रे, भावन्या विवेक वर्तक, प्रतापराव मोरे महेश पाटील, जीवा महाले अतिश वर्तक, संभाजी कावजी प्रदीप वर्तक, बिजली शितल अशोक म्हात्रे, मावळे संदेश म्हात्रे, साई म्हात्रे, अरब सैन्य क्रिश म्हात्रे, सुरेश वर्तक, आर्य म्हात्रे आदी कलाकार आपल्या अभिनयातून भूमिका बजावणार आहेत. नाटकाचे व्यवस्थापन जय हनुमान मित्र मंडळ व गोवठणे ग्रामस्थ मंडळाचे आहे. सध्या या नाट्य प्रयोगाच्या तयारीच्या दृष्टीने, सरावाच्या तालमीची जोरदार तयारी सुरू असून, सर्वच कलाकार परिश्रम घेत आहेत.