माथेरानमध्ये शिवजयंती साजरी

। माथेरान । वार्ताहर ।
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे एक श्रद्धास्थान व स्फूर्तिस्थान असून त्यांची शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक सण व उत्सव आहे.यामाथेरान मध्ये अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.पारंपरिक पद्धतीने येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. यामुळे माथेरान नगरीमधील संपूर्ण वातावरण हे शिवमय झालेले होते. अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या व माथेरानकरांच्यावतीने अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. मागील दोन वर्षातील कोरोनामुळे सर्वच उत्सव आणि सणांवर बंदी घालण्यात आली होती. परंतु आत्ता राज्यात सण व उत्सव साजरे करण्यासाठी सर्वत्र निर्बंध उठविले गेले आहेत. आणि यामुळेच माथेरानमध्ये बुधवार दि.3 रोजी अक्षयतृतीयेला सकाळपासूनच माथेराननगरी शिवमय झाली होती. श्रीराम चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, प्रेरणा सावंत, प्रसाद सावंत, रेखा चौधरी, अंकिता तोरणे,निधी जाधव,गौरंग वाघेला,निखिल शिंदे,जय शिंदे,अमोल चौगुले,शैलेश वाघेला,दिनेश कदम, हेमंत पवार,रघुनाथ कदम, ज्ञानेश्‍वर बागडे,संदिप शिंदे, प्रकाश सुतार,रविंद्र सुतार,उमेश कदम,किशोर धनावडे उपस्थिती होते.

Exit mobile version