| हमरापूर । प्रतिनिधी ।
जि.प. सदस्या चित्रा आस्वाद पाटील, पेण पंचायत समिती सभापती मनिषा संजय भोईर, ग्रुप ग्रामपंचायत शिहू सरपंच पल्लवी भोईर, उपसरपंच गिता कुथे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांनी लेझीमच्या तालात गावातून शिवाजी महाराजांची प्रतिमेची मिरवणूक काढत धुमधडाक्याने शिहू, चोळे येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.
यानिमित्ताने चोळे, चोळे टेप,गांधेपाडा, दत्तवाडी, आंबेराई, गांधे, गांधे अदिवासी वाडी येथील महिलांकरिता हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भोईर यांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व महिला सबलिकरण व त्या माध्यमातून ग्रामविकास होणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर महिलांनी आपल्या कक्षा रुंदवल्या पाहिजेत, विचार उंचावले पाहिजेत, स्वतःची, कुटुंबाची, गावाची प्रगती होण्यासाठी विचारांची देवाणघेवाण होणे आवश्यक आहे असे सांगून शिहू ग्रुप ग्रामपंचायतीच्या विकासाचा डंका जिल्ह्यात सर्वत्र ऐकायला येत आहे तेव्हा ग्रामपंचायत सूत्रे हातात असलेल्या महिला टिमचे विशेष कौतुक आहे. विकासाची गंगा अशीच वाहत राहो व त्याकरिता सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही चित्रा पाटील यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा नेते प्रसाद भोईर, पेण पं. स मा. सभापती संजय भोईर ग्रामपंचायत सदस्या राजेश्री कुथे, जयश्री खाडे, घनश्याम कुथे, अमृत कुथे, वसंत पाटील, शिहू विभाग चिटणीस चंद्रकांत म्हात्रे, दत्ता कुथे, मोहन म्हात्रे, प्रविण कुथे, लंबोदर कुथे, हेमंत कुथे, राजा म्हात्रे, रोशन पाटील यांसह अनेक तरुण-तरुणी मंडळींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.







