आठ गडांवर होणार शिवराज्याभिषेक सोहळा

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यात शिवकालीन आठ गडकिल्ले आहेत. त्या सर्व ठिकाणी यावर्षी पासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. तिथीप्रमाणे यावर्षी 20 जून रोजी राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचा 350 स्वराज्य शिवराज्याभिषेक सोहळा समितीने निश्‍चय केला आहे.

हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराज यांनी 350 वर्षापूर्वी केली. त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तिथीप्रमाणे साजरा करण्यात येणार आहे. कर्जत तालुक्यातील ढाक भैरी, कोथळीगड, पदरगड, सोंडाई, विकटगड, सोनगीरी, तुंगी, भिवगड आदी आठ गड किल्ल्यांवर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. तसेच कर्जत शहरात श्री कपालेश्‍वर देवस्थान अशा सर्व ठिकाणी 20 जून रोजी सकाळी नऊ वाजता शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याची जबाबदारी स्थानिक तरुणांनी घेतली आहे.त्या सर्व आठ गडकोट या ठिकाणी राज्याभिषेक सोहळ्या करिता महाराजांची सिंहासनावर बसलेली मूर्ती कर्जत येथे आयोजित कार्यक्रमात देण्यात आली.

Exit mobile version