। उरण । वार्ताहर ।
येथील मी उरणकर सामाजिक व संस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती निमित्त शिवकालीन शस्त्र व दुर्मिळ नाण्यांचे मोफत प्रदर्शन सोमवारी (दि. 21) सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत तेरापंथी हॉल, वाणी आळी, उरण येथे भरविण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजक मी उरणकर सामाजिक व संस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल पाटेकर होते. या शिबिरास अनेक मान्यवरांनी भेट देऊन आयोजक विशाल पाटेकर यांचे कौतुक केले.
उरण शहरातील नागरिकांनी प्रथमच शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रे, दुर्मिळ नाणी अनुभवले. प्रदर्शनात सुमारे 24 पॅनल आहेत, शिवकालीन स्त्र व दुर्मिळ नाणी यांची माहिती संग्राहक जोसेफ लोपीस यांनी दिली.







