| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील उकरूळ ग्रामपंचायतीमधील उपसरपंच विलास खडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त असलेल्या उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत ग्रामविकास आघाडीचे शिवाजी जानू गोसावी हे विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून विजयी झाले.
उपसरपंचपदासाठी ग्रामविकास आघाडीकडून शिवाजी गोसावी तर शिवसेना ठाकरे गटाकडून पंकज म्हसे यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. शिवाजी गोसावी यांना सहा तर पंकज म्हसे यांना चार मते मिळाली. त्यामुळे पीठासीन अधिकारी खडे यांनी उकरूळ ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच पदावर शिवाजी जानू गोसावी हे विजयी झाल्याचे जाहीर केले. मतदान प्रक्रियेत पीठासीन अधिकारी सरपंच खडे यांच्यासोबत ग्रामविकास अधिकारी सुधीर लोहकरे यांनी काम पहिले.