शेकापचे शिवाजी सांबरी उपसरपंचपदी

| नेरळ | प्रतिनिधी |

मोग्रज ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे शिवाजी नागो सांबरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंच पदावर प्रकाश थोराड यांनी राजीनामा उपसरपंच पदाची निवडणूक लावण्यात आली होती. उपसरपंच प्रकाश थोराड यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. पीठासीन अधिकारी आणि थेट सरपंच रेखा पुंडलिक देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत उपसरपंच पदासाठी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते असलेले सदस्य शिवाजी नागो सांबरी यांनी नामांकन अर्ज दाखल केला होता.

निर्धारित वेळेत शिवाजी सांबरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने उप सरपंच पदासाठी शिवाजी सांबरी यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे पीठासीन अधिकारी सरपंच रेखा देशमुख यांनी जाहीर केले. पीठासीन अधिकारी देशमुख यांना ग्राम अधिकारी गणेश गायकर यांनी निवडणूक कामी सहकार्य केले. नवनिर्वाचित उप सरपंच यांचे अभिनंदन करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे, शेकाप युवक तालुका अध्यक्ष महेश म्हसे, आदिवासी संघटना माजी अध्यक्ष भरत शीद, भात गिरणी संचालक महेश म्हसे, अर्जुन सकपाळ, सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक देशमुख, माजी उपसरपंच प्रकाश थोराड, गणेश जाधव, महेश रसाळ, भगवान भगत, अदित्य गायगवाड, दत्ता ठोंबरे, कर्मचारी देऊ अगिवले, संजय मेचकर, मनोहार अगिवले, संतोष मेचकर, लालचंद्र सांबरी उपस्थित होते.

Exit mobile version