पेणमध्ये शिवमय वातावरण

| पेण | वार्ताहार |
पेण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रविवारी दिवसभर जय शिवराय जय जिजाऊच्या नाद घोषाणे आसमांत दुमदुमला होता. नगरपालिकेडून शासकीय शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आली. पेण नगरपालिकेच्या कार्यालयापासून कर्मचारी अधिकारी वर्गाने देखील भगवे फेटे परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजेरी लावली. त्यावेळी त्यांच्या समवेत आ.रवि पाटील, प्रांत विठ्ठल इनामदार, तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे सहभागी झाले होते. मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या हस्त पुतळयास पुष्पहार घालण्यात आले. सभागृहामध्ये प्राचार्य एम.एन.पाटील यांच्या शिवव्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रथमच तारखेप्रमाणे पेण येथील शिवसैनिकांनी महाराजांच्या अर्ध पुतळयाला मानाचा मुजरा केला. यावेळी नरेश गावंड, दिपश्री पोटफोडे, जगदीश ठाकूर, शिशिर धारकर, नगरसेवक कृष्णा भोईर, संदीप सुर्वे, मिहिर धारकर, राजा पाटील यांच्यासह मोठया प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. तर संभाजी ब्रिगेडकडून परमानंद स्वप्निल म्हात्रे, आनंद जाधव यांच्यासह मोठया प्रमाणात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते हजर होते.

तर दिवसभरात अनेक शिवप्रेमी तरुणांनी महाराजांच्या वेगवेगळया गडांवरून शिवज्योतीसह तरुण वर्ग महाराजांना मानवंदना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात येत होते. शहरात शिवमय वातावरण पहायला मिळाले. ग्रामीण भागामध्ये देखील मोठया प्रमाणात शिव जयंती गावागावात साजरी करण्यात आली. तसेच एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र शिक्षण संस्था, महिला शिक्षण संस्था पेण, नगरपालिका शाळा यांच्या मध्ये देखील शिवजयंती मोठया उत्साहात साजरी केली.

Exit mobile version